डॉ.सत्यभामा स.जाधव यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने *भव्य धान्य महोत्सव २०२२* *विकेल ते पिकेल या अभियान अंतर्गत* शेतकरी ते थेट ग्राहक विक्री मेळावा मध्ये *बळीराजा गृहउद्योगाच्या संचालिका तथा जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्षा डॉ सत्यभामा जाधव* यांना विशेष पुरस्कार देऊन मा.जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री.परदेशी जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे,कृषी संचालिका सोनवणे मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव सतिश कुमार जाधव आदी उपस्थित होते.मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड व कृषी परिषदेचे त्यांना विशेष सहकार्य मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा