*पुणे येथे IFBB मि. युनिव्हर्स- बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप अँड फिटनेस फेस्टिव्हल इंडिया 2022"*
15 ते 17 एप्रिल 2022 रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस (IFBB मान्यतेने प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप महिला व पुरुष "IFBB MR/MS युनिव्हर्स चॅम्पियनशिप आणि फिटनेस फेस्टिव्हल 2022 आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धा इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन (IBBFF) द्वारे स्पर्धेचे आयोजन केले आहे.
'मि युनिव्हर्स' चॅम्पियनशिपमध्ये 100 हून अधिक देश, 1500+ हून अधिक खेळाडू सहभागी होतील. कार्यक्रमाच्या ठिकाणी IBBFF द्वारे फिटनेस EXPO प्रदर्शनाची व्यवस्था देखील आहे.
अलीकडच्या काळात, IBBFF कडे “मि. आशिया 2009", 65 वी मि. वर्ल्ड चॅम्पियन 2011', 'IFBB डायमंड कप
2018' आणि 'IFBB डायमंड कप 2019' या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजनाचा अनुभव संघटने कडे आहे. मिस्टर युनिव्हर्स या जागतीक स्पर्धे साठी सर्व भारतीय खेळाडूंना परदेशात जाणे आर्थिक दृष्ट्या शक्य नाही परिणामी IFBB शक्य होईल तेवढ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा बोदयबिल्डर्स साठी भारतात आणण्याचा शक्य तेवढा प्रयत्न या माध्यमातून करत आहे . स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना सर्टिफिकेट व अन्य बक्षिसे मिळणार असून नोकरी व व्यवसाय करता फायदा निश्चीत होईल.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धे साठी अससोसिइट्स पार्टनर ग्राविटी पुणे, ऑफिशियल पार्टनर विवा फिटनेस इंडस्ट्री , ऑन बोर्ड स्पॉन्सर्स वेंकीज ग्रुप ऑफ कंपनी अश्या विविध मोठ्या कंपन्या स्पॉन्सरशीप साठी पुढे येत आहेत.
या कार्यक्रमा चे यशस्वी आयोजन ifbb चे अध्यक्ष राफेल संतोसा यांचे मार्गदर्शन व IBBFF चे अध्यक्ष श्री संजय जोशी व IBBFF आणि AFBF चे सरचिटणीस डॉ. संजय मोरे सर आणि ग्राविटी ग्रुप चे चेअरमन मिहीर कुलकर्णी यांनी केले असून भारतीय खेळाडूंना सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.
अशी माहिती BBAFA पुणे उपाध्यक्ष निलेश काळे यांनी दिली आहे , सोबत कश्यप खंडागळे (IBBF, लीगल ADVISER) , BBAF पुणे अध्यक्ष मंगेश परदेशी सर , सेक्रेटरी विवेक माने , योगेश कांबळे व सिनियर बॉडीबिल्डिंग जज इलियास शेख उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा