Breaking

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

बेंबळे सोसायटीवर आमदार बबनदादा शिंदे गटाचा दणदणीत विजय... 13 पैकी 13 संचालक विजयी विरोधी भाजप पार्टीचा दारुण पराभव



बेंबळे सोसायटीवर आमदार बबनदादा शिंदे  गटाचा दणदणीत विजय...

 13 पैकी 13  संचालक विजयी
 विरोधी भाजप पार्टीचा दारुण पराभव


 बेंबळे। प्रतिनिधी                    

               माढा तालुक्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या प्रतिष्ठित बेंबळे विविध कार्यकारी सेवा सोसायटी वर आमदार बबनदादा शिंदे गटाचा दणदणीत विजय झालेला असून तेरापैकी तेरा संचालक मोठ्या मताधिक्क्याच्या फरकाने विजयी झाले आहेत.

 सविस्तर वृत्तांत असा की बेंबळे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे पंचवार्षिक निवडणूक गुरुवार दिनांक 21 एप्रिल रोजी झाली. या निवडणुकीसाठी 1073 मतदारांपैकी 824 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर लगेच झालेल्या मतमोजणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे गटाने संचालकाच्या 13 पैकी 13 जागा जिंकून भाजप प्रणित पोपट अनपट व रत्नाकर कुलकर्णी यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला. संपूर्ण मतदानामध्ये आमदार शिंदे गटाचे सर्व 13 उमेदवार सरासरी 100 मताधिक्क्याच्या फरकाने विजय झाले आहेत.
  राष्ट्रवादीच्या विमलेश्वर- सिद्धेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार या प्रमाणे.... रामचंद्र अनपट ,अनिल अवताडे ,कांतीलाल काळे ,बाळू कोकाटे ,ज्ञानेश्वर पवार ,सदाशिव भोसले ,अरुण माने ,सागर हुंबे, मोहन किर्ते, संभाजी चोरमल ,अब्दुल तांबोळी, प्रतिभा भोसले व स्वाती भोसले असे आहेत .
चौकट....
विशेष म्हणजे कारखान्याचे संचालक  विष्णुपंत हुंबे गट व माजी चेअरमन संजय पवार दिलीप भोसले गोविंद भोसले यांचा गट हे एकमेकांचे विरोधक असले तरीही आमदार बबनदादा शिंदे यांना संपूर्णपणे मानणारे गट आहेत. या दोन्ही गटांनी अर्ज भरताना एकमेकांच्या विरुद्ध  दंड थोपटले होते, परंतु आमदार बबनदादा शिंदे यांनी या दोन्ही गटात रितसर समझोता घडवून आणला  व  तसेच संपूर्ण निवडणूक या दोन्ही गटांनी एकत्रितपणे व पूर्ण ताकदीनिशी लढवल्यामुळे शंभर टक्के यश मिळवता आले.
 या विजयासाठी पार्टी प्रमुख गोविंद भोसले, विष्णू हुंबे ,दिलीप भोसले, हनुमंत लोंढे, संजय पवार, कैलास भोसले, डॉक्टर भीमराव पवार ,तात्यासाहेब पवार, संतोष शिंदे ,गोरख मिस्कीन, यशवंत भोसले आदी मान्यवरानी आणि सर्वच आ. बबनदादा निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
      सर्व विजयी उमेदवारांचे, पार्टी प्रमुखांचे आणि कार्यकर्त्यांचे आमदार बबनदादा शिंदे जिल्हा परिषद सदस्य रणजीत भैय्या शिंदे आमदार संजय मामा शिंदे सभापती विक्रम दादा शिंदे आदी मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले आहे. या  निवडणुकीसाठी टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय भानवसे, हजारे, माने -देशमुख, डोंगरे, विजय कांबळे, खंडागळे ,अश्फाक शेख व पोलीस पाटील बिभीषण कीर्ते यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिवकुमार मुंडासे यांनी काम पाहिले ,त्यांना संस्थेचे सचिव महादेव घाडगे यांनी सहकार्य केले.
             निवडणुकीचा निकाल जाहीर होताच
 विमलेश्वर- सिद्धेश्वर पॅनलच्या पार्टी प्रमुखा सहित शेकडो कार्यकर्त्यांनी व नूतन संचालकांनी गुलाल उधळून , मिरवणूक काढून व फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा