Breaking

गुरुवार, २१ एप्रिल, २०२२

संचालकपदी लोकनेते बाळासाहेब नाहाटा यांची वर्णी









संचालकपदी लोकनेते बाळासाहेब नाहाटा यांची वर्णी


श्रीगोंदा-नितीन रोही,

तालुक्यातील लोणी व्यंकनाथ चे सुपुत्र आणि राज्य बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांची राज्य कृषी पणन मंडळावर संचालक पदी नियुक्ती.
 नाहाटा यांची नुकतीच राज्य बाजार समिती संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. राज्य बाजार समिती संघाचे अध्यक्ष हे राज्य कृषी पणन मंडळाचे पदसिद्ध संचालक असतात. त्यामुळे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी बुधवारी नाहाटा यांची कृषी पणन मंडळाच्या पदसिद्ध संचालकपदीचे नियुक्ती झाल्याचे पत्र दिले.

नाहाटा यापूर्वी श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती, पंचायत समिती सदस्य, राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेशाध्यक्ष अश्या प्रकारचे विविध पदे भूषवली आहेत. आता नाहाटा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कोट्यातून मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.त्यामुळे नाहाटा यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा