*येवती येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर तालुक्यातील येवती येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या कालावधीत श्री हनुमान भजनी मंडळ व रुक्मिणी महिला भजनी मंडळ यांच्या सहकार्याने हा सुखसोहळा संपन्न झाला, दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी ह.भ.प. अशोक महाराज वडजी यांच्या हस्ते काला वाटप करून सांगता करण्यात आली,यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या काल्याचा व महाप्रसादाचा लाभ घेतला, या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास विशेष सहकार्य, समाधान ढोले,व श्री हनुमान भजनी मंडळ, रुक्मिणी महिला भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ येवती यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा