*श्री गणपती फार्मसीची औषधनिर्माण कंपनीला भेट.*
मौजे अकोले(खु.) येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने बारामती एमायडीसी मधील विश्वचैतन्य या आयुर्वेदिक औषधनिर्माण कंपनीला भेट दिली.
यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी कंपनीतील विविध विभागाची माहिती घेतली. कंपनीचे संचालक डॉ. प्रकाश खाडे यांनी कंपनीतील सर्व उत्पादनांची तसेच सर्व विभागांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कंपनीची एकूण 300 आयुर्वेदिक उत्पादने उपलब्ध आहेत.
यावेळी तेथील उत्पादन विभाग, गुणवत्ता निरसन विभाग, पॅकेजिंग आणि लेबलिंग विभाग, विपणन विभाग, इ. विभागांची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले. कंपनीची सर्व उत्पादने आयुर्वेदिक व प्राचीन पद्धतीने तयार केली जातात आणि त्यांना भारतातूनच नव्हे तर संपुर्ण जगभरातून मागणी आहे. या कंपनीला भेट दिल्याने विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर पडली आहे.
प्रा. शिवराज ढगे व प्रा. सुकुमार लांडे यांनी समन्वयक म्हणून कार्य केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ . रूपाली बेंदगुडे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. केतकी पाटील, प्रा. मोनिका माळी, प्रा. कोमल यादव, प्रा. रूपाली राऊत, प्रा. दिव्या ओस्तवाल उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा