पुढील दहा वर्षांचा विकास आराखडा तयार करा - गणेश मोरे
मोहोळ प्रतिनिधी - गाव पातळीवरील सार्वजनिक तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना लाभ व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आहे . या योजनेचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे . ज्याला गरज आहे त्यांनी ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी करावी . तसेच यातून वैयक्तिक लाभार्थ्यांला तसेच त्यांच्या व्यवसायांना मदत होणार असून गावाचे नियोजन होणार असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी केले आहे .
पापरी . ता . मोहोळ येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत " दशवार्षिक नियोजन आराखडा " या चार दिवसीय व तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते . यावेळी सरपंच जयश्री कोळी . विस्ताराधिकारी नंदकुमार बागवाले . संदीप खरबस . सौदागर खडके . युवराज भोसले . ग्रामसेवक अनंत नकाते . कृषी सहायक भरत सुरवसे . नागेश कांबळे . अजिंक्य साखरे . आदी सह तालुक्याच्या विविध गावातील ग्रामसेवक . रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा