Breaking

रविवार, १७ एप्रिल, २०२२

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विचारांचं विद्यापीठ : प्रा. वजाळे*


*महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विचारांचं विद्यापीठ : प्रा. वजाळे


*श्री माऊली शिक्षण संस्थेत राष्ट्रपिता महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*


               दि:१४ एप्रिल (प्रतिनिधी): श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज,टेंभुर्णी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

                   कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने करण्यात आली, तर उपप्राचार्या सौ.सोनल शेवतेकर मॅडम यांनी राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून शिक्षण घेणे किती महत्वाचे आहे यासाठी सर्व समाजातील मुलांना शिक्षण दिले तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील रूढी परंपरांना झुगारून इतिहास कसा घडवला याबद्दल माहिती सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इयत्ता सातवीतील सिद्धी तळे या विद्यार्थिनीने आपले मनोगत मांडत असताना डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याविषयी माहिती सांगितली, तर श्रुती शिंदे या विद्यार्थिनीने महात्मा ज्योतिबा फुले यांनी जातपात न मानता शिक्षणाची मुहूर्तमेढ कशी रोवली असे मनोगत व्यक्त केले, यानंतर प्रा. युवराज वजाळे सर यांनी बोलत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खडतर जीवन प्रवास यातूनही त्यांनी कसे यश संपादन केले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून सर्व जातीधर्मातील मुलांना शिक्षण दिले विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या पद्धतीने व्याख्यान केले.
              यावेळी संस्थेचे चेअरमन श्री योगेश बोबडे सर, सचिवा सौ. सूरजा बोबडे, प्रमुख पाहुणे प्रा. युवराज वजाळे, आर पी आय जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ , गणेश ढगे सर, उपप्राचार्या सौ.सोनल शेवतेकर मॅडम, PRO खुळे सर, को - ऑर्डिनेटर पठाण सर ज्यु. कॉलेज विभागप्रमुख ननवरे सर सर्व शिक्षक  व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी चव्हाण व वैष्णवी शिखरे यांनी केले तर आभारप्रदर्शन अमर काळे सर यांनी केले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा