Breaking

शनिवार, १६ एप्रिल, २०२२

10 एप्रिल अखेर अनुदानासह प्रति टन 2200 प्रमाणे ऊस बिल व 31 मार्च अखेर ऊस तोडणी वाहतूक बील ‌अदा- आ.बबनराव शिंदे


10 एप्रिल अखेर अनुदानासह प्रति टन 2200 प्रमाणे ऊस बिल व 31 मार्च अखेर ऊस तोडणी वाहतूक बील ‌अदा- आ.बबनराव शिंदे
 बेंबळे।प्रतीनीधी।             फोटो

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2021-22 गळीत हंगामामध्ये 10 एप्रिल,2022 अखेर गाळप झालेल्या ऊसाचे प्रतिटन 2100/- व प्रति मे.टन रू.100/- अनुदान याप्रमाणे प्रतिटन रू.2200/-प्रमाणे पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले आहे त्याचबरोबर  31 मार्च अखेर संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक बीले अदा करण्यात आले असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनदादा शिंदे  यांनी दिली.

 

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे युनिट नं.1 व 2 चे ऊस गाळप सुरू असून आजअखेर युनिट नं.1 कडे 21 लाख 97 हजार 942 मे.टन तर युनिट नं. 2 कडे 6 लाख 48 हजार 453 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या हंगामात दोन्ही युनिटकडे 10 एप्रिल,2022 अखेर गाळप झालेल्या ऊसाचे प्रतिटन 2100/- व जाहीर केल्याप्रमाणे प्रति मे.टन रू.100/- अनुदान याप्रमाणे प्रतिटन रू.2200/-प्रमाणे पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले आहे. तसेच दोन्ही युनिट कडे ऊस तोडणी वाहूतक करणा-या कंत्राटदारांचे 31 मार्च अखेर संपूर्ण ऊस तोडणी वाहतूक बीले अदा करण्यात आलेली आहेत अशी माहीती आ.शिंदे यांनी दिली.

 

चौकट-

सन 2021-22 गळीत हंगामासाठी युनिट नं.1 व 2 कडे नोंदलेल्या सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांचे संपूर्ण ऊसाचे एप्रिल अखेर गाळप करण्याचे नियोजन कारखान्याने केलेले असून त्यासाठी परराज्यातून व इतर जिल्ह्यातून ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध केलेली आहे. माढा तालुक्यातील संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही अशी माहीती आ.शिंदे यांनी दिली.

 

चौकट-

खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 22 मे रोजी विठ्ठलराव शिंदे कारखाना कार्यस्थळावर मोफत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा व माहे जून मध्ये जेष्ठ नागरिकांसाठी मोफत काशी यात्रा व बुध्दगया यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. विवाह सोहळ्याची नोंदणी सुरू असून इच्छुक वधू-वरांनी त्यांची विवाह नोंदणी कारखाना कार्यस्थळावर व शेती विभागाचे गट सेंटरवर करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा