महामानवांची जयंती वाचुन साजरी करू - बालाजी सिरसाट
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
लोहा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त १३१ पुस्तकाचे वाटप-संभाजी ब्रिगेडचा सामाजिक उपक्रम
उमरा येथे भीम जयंती मंडळाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती २८ एप्रिल रोजी मौजे उमरा ता.लोहा येथे साजरी होत आहे.
जयंतीचे औचित्य साधून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा पत्रकार सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील सिरसाट यांनी संभाजी ब्रिगेडच्या वैचारिक माध्यमातून त्यांनी यावर्षी एक आगळा-वेगळा उपक्रम म्हणून महामानवांची जयंती नाचुन नाही तर वाचुन साजरी करू हा एक सामाजिक उपक्रम हाती घेऊन दिनांक २८-एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीदिनी शिव शाहू फुले आंबेडकर गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्र्यावरील १३१ महामानवांचे पुस्तके वाटप करण्याचा निर्धार केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा