Breaking

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

अशोक जगदाळे यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन


अशोक जगदाळे यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन


प्रतिनिधी:- अजित चव्हाण

नळदुर्ग:- तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम समाजासाठी इफ्तार पार्टी देण्यात आली.
   अशोक जगदाळे यांनी अब्दुल हसनात इमाम कासीम मस्जिदचे हाफेज अली सौदागर व पेश इमाम सद्दीक शेख यांचा पूर्ण आहेर देऊन सत्कार केला. त्यानंतर मस्जिद कमिटीच्या वतीने अशोक जगदाळे व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहा वर्षीय सकीना सलीम सय्यद या मुलीने रोजा ठेवल्याबद्दल अशोक जगदाळे यांच्या हस्ते तिला रोजा सोडण्यासाठी सरबत देण्यात आले. 

  यावेळी माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, शरीफ शेख, संजय मोरे, अमृत पुदाले, रुकनोद्दीन शेख, सलमान काझी, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, लतीफ शेख, अजित चव्हाण, अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव, नवल जाधव, दीपक काशीद, अमित शेंडगे, अफसर जमादार, विशाल डुकरे, सुजित बिराजदार, यांच्यासह हिंदू- मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
  यावेळी बोलताना अशोक जगदाळे यांनी म्हटले की, मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना हा अतिशय पवित्र मनुन ओळखला जातो. नळदुर्ग शहरात हिंदू- मुस्लिम धर्मियांचे सर्व सण व उत्सव शांततेत पार पडतात. शहरात हिंदू- मुस्लिम एकता असेच पुढे चालू ठेवावे असे अशोक जगदाळे म्हटले आहे. 
  इफ्तार पार्टीचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सलीम शेख, इब्राहिम शेख, मुख्तार काझी, फक्रोद्दीन मुजावर, अतिक शेख, हुसेन शेख, अबूबकर शेख, इस्माईल शेख, वाहिद शेख, इब्राहिम बाडेवाले, रईस शेख, व सालेम पठाण यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा