भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न
दि 29 एप्रिल 2022 रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या स्पर्धकांचा सत्कार माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज दादा शिंदे, निमगाव टे चे आदर्श सरपंच यशवंत भैय्या शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
निमगाव टे येथील सिद्धार्थ तरुण मंडळ आयोजित खालील स्पर्धांमध्ये विद्यार्थी यांनी यश संपादन केले.
रंगभरण-प्रज्ञान लोंढे- प्रथम, खरात- द्वितीय, करुणा लोंढे-तृतीय, निबंध लहान गट - प्रज्ञान लोंढे-प्रथम, वैष्णवी उपासे-निबंध, प्रभाशी लोंढे- तृतीय, ज्ञानेश्वरी खापरे- उत्तेजनार्थ, मध्यम गट-सिद्धी भोसले-प्रथम, तृप्ती वाघमोडे- द्वितीय, वैभवी शिंदे- तृतीय, प्रणाली पांढरे- तृतीय, मोठा गट- शिवांजली लोहार-प्रथम, समृद्धी उपासे-द्वितीय, अनुजा शिंदे- तृतीय, प्रज्ञा सरक- उत्तेजनार्थ, विराज कांबळे-उत्तेजनार्थ आणि वक्तृत्व स्पर्धेत लहान गट- प्रज्ञान लोंढे-प्रथम, प्रभाशी लोंढे-द्वितीय, वैष्णवी उपासे- तृतीय, मध्यम गट- सिद्धी भोसले- प्रथम, वैभवी शिंदे-द्वितीय, संग्राम आतकर- तृतीय, प्रज्ञा लोंढे- उत्तेजनार्थ, मोठा गट- समृद्धी उपासे-प्रथम, प्रज्ञा सरक- द्वितीय, विराज कांबळे- तृतीय, राज लोंढे अंगणवाडी, वैष्णवी जाधव- प्रथम, कुंतल लोखंडे-द्वितीय, संजीवनी लोंढे-तृतीय, प्रणाली पांढरे- उत्तेजनार्थ, खुला गट- रसिका लोंढे- प्रथम, रूपाली ठोसर- द्वितीय
सिद्धार्थ तरुण मंडळाने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आ बबनदादा शिंदे, आ संजयमामा शिंदे, धनराजदादा शिंदे, यशवंत भैय्या शिंदे यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा