*श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कोमात आणि मटका जुगार जोमात*
(गुरसाळे गावातील मटका बंद करा)
*गुरसाळे प्रतिनिधी:* AJ 24 Taas News Maharashtra Network
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अवरात विविध प्रकारचे मटका जुगार तसेच अवैध धंदे बेकायदेशीर रित्या सुरू असून त्यावर पंढरपुर तालुक्याचे पोलिस निरीक्षक यांचा यावर कसल्याही प्रकारचा अंकुश नसून ते त्यांना पाठीशी घालत आहेत काय असे गुरसाळे गावातील जनता बोलते आहे.या धंद्यामध्ये अनेक घरे उद्ध्वस्त होत आहेत.तसेच या गावातील युवक वर्ग वाम मार्गाला जाताना दिसत आहे.हा मटक्याच्या धंदा चालवणे हा कायद्याने गुन्हा आहे.हा धंदा चालवणाऱ्या मालकाला तडीपार करावे असे गुरसाळे गावातील जनतेला वाटते आहे.पंढरपूर तालुक्यातील पोलिस निरीक्षक काय पाऊल उचलणार याकडे गुरसाळे गावातील गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा