पत्रकार सुशिल गायकवाड
निर्भीड पत्रकार पुरस्काराने सन्मानित
पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर
दुर्गाडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
लोणंद/प्रतिनिधी.
पाडेगाव (नेवसेवस्ती) ता.फलटण येथील पाडेगाव सामाजिक विकास फाऊंडेशन यांच्या कडून युवा पत्रकार सुशिल सुदर्शन गायकवाड यांना "निर्भीड पत्रकार पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.महापुरुष जयंती महोत्सव सप्ताहात सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील "निर्भीड पत्रकार पुरस्कार" सुशिल गायकवाड यांना देण्यात आला.हा पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.निर्भीड पत्रकार पुरस्काराचे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह,झाडाचे रोपटे आणि पुस्तक देऊन सन्मान करताना यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती अशोकराव खरात,पाडेगावच्या लोकनियुक्त सरपंच स्मिताताई खरात,सुदाम बनकर,अरविंदभाऊ ढावरे,सुरवडीचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी राऊत, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे ऊस विशेषज्ञ डॉ.भरत रासकर,संग्राम शेळके-पाटील आदी मान्यवर तसेच पाडेगाव ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार सुशिल गायकवाड यांच्याकडून विविध वर्तमान पत्राच्या माध्यमातून सामाजिक विषयावर लेखन करत असताना परखडपणे मुद्दे मांडले गेले.तरडगाव सह लोणंद आणि खंडाळा तालुक्यातून पत्रकारितेचे काम करत असताना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असतो.सुशिल गायकवाड गेली तीन वर्षे खंडाळा तालुक्यातून पत्रकारितेचे काम करत आहेत.लोकांमधून पत्रकार सुशिल गायकवाड यांच्या पत्रकारितेबद्दल समाधान व्यक्त केले जाते.अनेक लेख लिहीत असताना त्यांनी अनेक वास्तवादी कविता सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे."असत्याचा बँड" नावाची त्यांनी लिहिलेली कविता अगदी वास्तव वादी असून नागपूर येथे प्रकाशित झालेल्या "मनाचे लॉकडाऊन" या काव्यसंग्रहातील पुस्तकात त्यांच्या कवितेची दखल घेण्यात आलेली आहे.यापूर्वी त्यांच्या पत्रकारितेची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.पाडेगाव सामाजिक फाऊंडेशकडुन देण्यात आलेल्या "निर्भीड पत्रकार पुरस्कारा"बद्दल पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकारांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पत्रकार सुशिल गायकवाड यांचे विशेष अभिनंदन केलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा