Breaking

बुधवार, २० एप्रिल, २०२२

मोडनिंब येथे म.जोतीबा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रसिक रंगले काव्यात.



मोडनिंब येथे म.जोतीबा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रसिक रंगले काव्यात.


मोडनिंब दि.२० म.जोतिबा फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मोडनिंब येथे ग्रामीण साहित्यिक,कवि शिवाजी बंडगर यांच्या 'रसिक रंगले काव्यात' या कार्यक्रमात रसिक श्रोते रंगून गेले.
बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कवी शिवाजी बंडगर यांनी राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक,
शैक्षणिक,कृषी,महिला जगत,लावणी अशा वेगवेगळ्या विषयारती कवितांचे ओघवत्या शैलीत सुंदर सादरीकरण करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक,अध्यक्ष सुनिल ओहोळ यांनी प्रास्ताविक केले.यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक निरिक्षक सुशील भोसले,जि.प.च्या माजी अध्यक्षा डाॅ.निशिगंधा कोल्हे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी,माजी सरपंच नागनाथ ओहोळ,कवि सुरेशकुमार लोंढे,सनातन शिंदे,दिगंबर काळे,शिवाजी सुर्वे,अवध जाधव,बापू शिंदे,प्रा.संतोष लोकरे,आबासाहेब पाटोळे,रफिक शेख,जयवंत ओहोळ,संतोष सुर्वे,प्रमोद गाडे,शेखर सुर्वे आदी मान्यवर होते.या कार्यक्रसाठी दयावान ओहोळ,महादेव गाडे,सुभाष जानराव,वसंत ताकतोडे,श्रीकांत जवंजाळ,विनोद नागटिळक,महेंद्र शिंदे,रवि ओहोळ,सतीश वाघमारे,प्रताप रणदिवे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्जुन बनसोडे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा