Breaking

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

चव्हाणवाडी विकास सेवा सहकारी सोसायटी .... शेतकरी विकास पॅनेलचे पहिल्याच दिवशी चार उमेदवारी अर्ज दाखल*



*चव्हाणवाडी विकास सेवा सहकारी सोसायटी .... शेतकरी विकास पॅनेलचे पहिल्याच दिवशी चार उमेदवारी अर्ज दाखल*

   
 

चव्हाणवाडी टें. सोसायटी निवडणूक


टेंभुर्णी (प्रतिनिधी) :- चव्हाणवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित चव्हाणवाडी टें ता. माढा या संस्थेच्या सन 2022 - 27 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 25 एप्रिल पासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शेतकरी विकास पॅनलचे चार उमेदवारी अर्ज भरण्यात आले अशी माहिती पॅनल प्रमुख, सुभाष बापू इंदलकर व माजी चेअरमन राहुल चव्हाण यांनी दिली आहे.
          यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष,सोसायटीचे चेअरमन तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सुभाष हरी इंदलकर व सोसायटीचे माजी चेअरमन राहुल पोपट चव्हाण या दोन उमेदवारांनी आपले अर्ज सर्वसाधारण गटातून दाखल केले. भटक्या जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्गातून प्रदीप बिरुदेव खडके आणि अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून बापू भिकाजी कांबळे असे एकूण चार उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी माढा येथील कार्यालयामध्ये भरण्यात आले. यावेळी सुभाष हरि इंदलकर, राहुल पोपट चव्हाण, उमराव रवींद्र चव्हाण, बापू भिकाजी कांबळे, प्रदीप बिरुदेव खडके उपस्थित होते.
त्यामुळे शेतकरी विकास पॅनलने सोसायटी निवडणुकीमध्ये आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
              अर्ज भरण्याचा कालावधी 25 एप्रिल 2022 ते 29 एप्रिल 2022 अर्जाची छाननी 02 मे 2022 उमेदवारी अर्ज माघारी घेणे 04 मे ते 18 मे 2022 ,मतदान दिनांक 27 मे 2022 आणि निकाल 27 मे 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता अशा पद्धतीने सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा