Breaking

सोमवार, २५ एप्रिल, २०२२

*लग्न लावून देतो म्हणून बनावट नवरी उभी करून पंधरा हजाराची फसवणूक करण्यात आली . याप्रकरणी नवरीसह सात जणांविरुद्ध मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल*


*लग्न लावून देतो म्हणून बनावट नवरी उभी करून पंधरा हजाराची फसवणूक करण्यात आली . याप्रकरणी नवरीसह सात जणांविरुद्ध मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल* 

********************


मोहोळ प्रतिनिधी - लग्न लावून देतो म्हणून बनावट नवरी उभी करून पंधरा हजाराची फसवणूक करण्यात आली . याप्रकरणी नवरीसह सात जणांविरुद्ध मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 


मोहोळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की खंडोबाची वाडी ( अनगर ) तालुका मोहोळ येथील बंडु महिपती नरके  यांचे लग्न जमवण्यासाठी त्यांनी एंजट युवराज विठ्ठल जमदाडे रा  भोसे करकंब  याला लग्न जमण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा त्यांनी लग्न लावण्यासाठी सव्वा लाख रुपये द्यावे लागतील मुलगी दाखवल्यावर पाच हजार  वेगळे द्यावे लागतील साखरपुडा ठरल्यास विस हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले आणि त्यांनी बंडू नरके यांना मुलगी पाहाण्यासाठी केव्हा येतो अशी विचारणा केली दुसऱ्या दिवशी मुलगी पाहण्यासाठी सोलापूर येथे बोलवले युवराज जमदाडे हे एका महिलेसह एसटी स्टँड वर आले तेव्हा बंडू नरके व त्याचा चुलत भाऊ मामा  भावजय यांना एजंट जमदाडे यांना  मुलगी दाखवली व तीचे नाव स्वाती पवार असे संगीतले व ती पसंत आहे का ? अशी विचारणा केली व तिचे आई-वडील  मयत झाले आहे तिचे नातेवाईक आम्हीच आहोत असे सांगुन पसंती आहे तर आता वेळ कशाला घालवता साखरपुडा करून टाकु असे म्हणून साखरपुड्याचा कार्यक्रम केला आणि  १९ एप्रिल रोजी लग्नाची 20 तारीख काढण्यात आली त्यादिवशी घरासमोर लग्न मंडप टाकून लग्नाची तयारी जोरदार केली दुपारी एक वाजता लग्न असल्याने सर्वजण मुलीची वाट पाहत असताना आमची गाडी स्वराज्य हॉटेल जवळ बंद पडल्यामुळे आम्ही एसटीने अनगर येथे आलो आहोत आम्हाला गाडी पाठवा म्हणून सांगितले मुलीला व पाहुण्यांना आणण्यासाठी गाडी पाठवली पाहुणे मंडळी लग्नात पोहचली पण लग्नात नवरी उभी करताना  तिच्या पायात जोडवे घालताना नातेवाईकांना पुर्वी जोडवे घातलेले वण आढळले 
याबाबत चौकशी केली असता मुलीस मराठी येत नाही म्हणून सांगितले पण मुलीची अधिक चौकशी केली असता मुलीचे खरे नाव  सायरा रफिक शेख वय २५ राहणार बिडी घरकुल सोलापूर असे तिने सांगितले तेव्हा आपली फसवणुक होते लक्षात आले व खोटी नवरी खोटी मुलगी दाखवून १५ हजार रुपयांची फसवणूक केली म्हणून बंडू महिपती नरके यांनी एजंट युवराज विठ्ठल जमदाडे रा भोसे करकंब . नवरीचा भाऊ सर्फराज सलीम  रा कुमठा नाका सोलापूर . चैतन्य प्रल्हाद गायकवाड रा शाहीर वस्ती भवानी पेठ सोलापूर .  शिवगंगा चैतन्य गायकवाड शाहीर वस्ती सोलापूर .शुभांगी सोमनाथ अधा टराव रा शिरापूर तालुका मोहोळ व महानंदा चितानंद म्हेत्रे रा बिडी घरकुल सोलापूर .  अशा सात जणा विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोहेकाॅ  मुसळे  हे करीत आहेत .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा