Breaking

शनिवार, ३० एप्रिल, २०२२

निष्काळजीपणाने वाहन चालवल्याने,तुळजापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल*



*निष्काळजीपणाने वाहन चालवल्याने,तुळजापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

तुळजापुर पोलीस ठाणे : सिंदफळ ग्रामस्थ- भिमराव घागरे, वय- 69 वर्ष हे 16 एप्रिल रोजी 12.00 वाजता सिंदफळ शिवारातील राष्ट्रीय महामार्ग पायी ओलांडत होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटार सायकल क्र एम.एच 44 एच 9431 ही निष्काळजीपने चालवल्याने भिमराव यांना धडकल्याने भिमराव हे गंभीर जखमी होउन मयत झाले. 
अशा मजकुराच्या मयताचा मुलगा संतोष  यांनी दि. 28 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304(अ), 279, 338, 427 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा