Breaking

शनिवार, ३० एप्रिल, २०२२

आंतरराष्र्टीय लायन्स संघटनेचा लिओ डिस्टीक मीट काँन्फरन्स 1 मे रोजी सोलापुरात अधिवेशन*


*आंतरराष्र्टीय लायन्स संघटनेचा लिओ डिस्टीक मीट  काँन्फरन्स 1 मे रोजी सोलापुरात  अधिवेशन* 

सोलापुर :- सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कोंकण या महसूली जिल्ह्यातील लायन्स आंतरराष्र्टीय संघटनेचा लिओ प्रांत 3234 D1 च्या अंतर्गत लिओ मुव्हमेंट कार्यरत आहे.या प्रांताचे प्रांतपाल लायन सुनील सुतार यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.या प्रांतातील युवकांना समाजसेवेचे गोडी निर्माण व्हावे आणि त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी लिओ मुव्हमेंट  चालविले जाते. या विभागाचे नेतृत्व हे वर्ष 2021-22 करता लायन अँड.श्रीनिवास कटकूर हे करत आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली या युवकांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी लिओ अधिवेशनाचे आयोजन रविवार दिनांक 1 मे 2022 रोजी बाळीवेस येथील हॉटेल ओरिएंटल इलाईट या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता केलेली आहे. 
या अधिवेशनात प्रांतपाल लायन सुनिल सुतार , लायन अशोक मेहता, लिओ मल्टिपल चेअरमन , प्रा रेवण शाबादे, जेष्ठ साहित्यीक व, प्रसिध्द वव्ते आणि  लायन राजशेखर कापसे निर्वाचित प्रांतपाल, लायन भोजराज निंबाळकर निर्वाचित प्रथम उपप्रांतपाल, लायन अँड एम्. के. पाटील निर्वाचित द्वितीय उपप्रांतपाल , सोलापूर जिल्ह्यातील सर्व माजी प्रांतपाल गण व रिजन चेअरमान , झोन चेअरमन  उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात युवकांना नेतृत्व आणि समाजसेवा याविषयी प्रबोधन आणि माहिती दिली जाणार आहे .
त्याचबरोबर  गोवा येथील रवींद्र भवन येथे संपन्न झालेल्या लायन्स अधिवेशनात नवनिर्वाचित नेतृत्वाचे सत्कार समारंभ ही संपन्न होत आहे. असे या लिओ डिस्टीक चेअरमन लायन अँड. श्रीनीवास कटकुर व अधिवेशनाचे चेअरमन लायन अरविंद कोणसिरसगी हे कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा