*तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील ग्रामदैवत भगवान काटेश्वर यात्रेची,जंगी कुस्त्याने सांगता*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
मौजे काटगाव तालुका तुळजापूर येथील ग्रामदैवत भगवान काटेश्वर यात्रेची सांगता जंगी कुस्ताने
सालाबादप्रमाणे 26.4.2022ते 28.4.22 प्रमाणे यात्रेचे आयोजन करण्यात आले होते 26.4.22 रोजी मानाच्या नंदिकौल स्थापना करण्यात आली 27.4.2022 रोजी नंदिकौलची भव्य दिव्य मिरवणूक झाली 28.4.2022 रोजी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस जिल्हा परिषद चे माजी कृषी सभापती पंडित भाऊ जोकर एस पी ग्रुपचे संस्थापक संजय दादा पाटील राष्ट्रवादी पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सागर दादा पाटील सोसायटीचे चेअरमन तानाजी बेटकर, उपसरपंच अशोक माळी गावचे मंडलाधिकारी शिंदे साहेब तलाठी सुरवसे साहेब यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष गणेश जोकार उपाध्यक्ष बालाजी बेटकर खजिनदार बाबुराव खोबरे सचिव अजय रोकडे रविराज पाटील अण्णाराव रेवगे,अमोल रोकडे सर,सोमनाथ पाटील, अशोक पवार,राहुल नकाते,गौरीशंकर पाटील व पंच म्हणून बब्रुवान शिंदे,श्रीशैल माळी, बटु माळी,अब्दुल मुजावर, अल्लाउदिन पटेल यांनी सहकार्य केले.तसेच पंचक्रोशीतील मल्ल व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते या कुस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे शेवटची कुस्ती काटगाव चे मल्ल गणेश जोकार यांची झाली पाच तोळे चांदीचे कडे व तीन हजार एक रोख बक्षीस होते या कुस्त्यांचे समालोचन दिपक माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवराज खोबरे सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा