बैलाची कत्तल करून त्याचे मांस विक्री करणारा पोलिसांच्या ताब्यात
महाड, ता.
महाड शहराजवळील किंजळोली या गावातील एका घरात एका बैलाची कत्तल करून त्याचे मांस विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे .या तरुणाकडून कत्तल केलेल्या बैलाचे सुमारे दीडशे किलो मांस आणि कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आलेली आठ जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. 28 एप्रिल ला दुपारी दीडच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
अटक केलेल्या तरुणाचे नाव शहबाज शब्बीर लाडगे (वय सत्तावीस रा. किंजळोली मोहल्ला ) असे आहे. किंजळोली मोहल्ला येथील एका घराच्या पडवीमध्ये गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे व त्यांच्या पथकाने 28 एप्रिल ला दुपारी एक वाजता लाडगे यांच्या घराच्या मागे असलेल्या गोठ्यामध्ये छापा घातला त्यावेळी पोलिसांना या ठिकाणी काळ्या रंगाच्या बैलाची कत्तल झाल्याचे निदर्शनास आले .कत्तल झालेल्या या बैलाचे सुमारे दीडशे किलो मांस घराच्या पडवी ठेवून त्याची विक्री केली जात असल्याचे पोलिसांना याठिकाणी दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी असणारे दीडशे किलो वजनाचे सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचे मांस जप्त केले.यासोबतच पोलिसांना या गोठ्या मध्ये सुमारे सव्वा लाख रुपये किमतीच्या कत्तलीसाठी आणलेली गाई व बैल अशी आठ जनावरे आढळली. ही जनावरे पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी या प्रकरणी शहबाज लाडगे यांच्या विरोधात भादवि कलम 429, महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम तसेच भारतीय प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम या नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार विशाल शिंदे करत आहे
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा