डांबरी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईट पट्टीला चक्क माती-मुरुम मिक्स...
बातमी देऊन सुध्दा अधिकारी घेतात झोपेचे सोंग
बांधकाम उप अभियंता करताहेत टोलवाटोलवी...
श्रीगोंदा:-
श्रीगोंदा हद्दीतील शाडूचा मळा ते हॉटेल नंदवन पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम जवळ जवळ झाले आहे.पण हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे असे त्या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांत बोलले जात आहे. सदर काम हे सार्वजनिक बांधकाम विभागच्या अंडर येत असून ते खासदार निधीतून सुरु आहे परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रस्त्याचे कारपेट करण्यात आले आहे मात्र त्यावरती बारीक बारीक खडे पडले आहेत.त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता उखडला जाऊ शकतो . ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे या रस्त्याचे निकृष्ट काम सुरू आहे. त्यामुळे वर्षभरात रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.खड्डे भरण्याऐवजी अनेकांच्या पोटाची खळगी मात्र नक्कीच भरली जातात. त्यामुळे रस्त्यांची अवस्था ‘ये रे माझ्या मागल्या’ अशीच आहे.
डांबर व खडी निकृष्ट दर्जाची होती त्यामुळे रस्त्यावर जागोजागी तसे निदर्शनास येते. ठेकेदारांच्या या गलथान कारभारामुळे हा रस्ता तयार होताच खराब होणार यात मात्र तीळ मात्र शंका नाही. या गलथान पणा मुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जाणार असल्याचे मत नागरीकांत व्यक्त केले जात आहे. खासदार निधीतून हा रस्ता होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे या रस्त्याच्या कामाकडे लक्ष असणे जरुरीचे आहे .मात्र अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे निष्कृष्ट काम झाले आहे का असा सवाल नागरिकांत विचारला जात आहे. स्थानिक रहिवाशी असलेले पत्रकार नितीन रोही यांनी वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अंपळकर साहेब यांना कल्पना दिली तरी सुद्धा हे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी सुध्दा या कामात मिलीभागत असल्याचे निदर्शनास येत आहेत.
चौकट,
#संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून त्वरित साईट पट्टी दुरुस्त करू घ्यावी अन्यथा तीव्र सोरूपाचे जनतेच्या वतीने आंदोलन होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
#तहसीलदार व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज.
#
ठेकेदार म्हणतोय नागरिकांचे हात पाय मोडले पाहिजे,त्यामुळे आम्ही असे करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा