Breaking

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

*"मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेच्या वतीने थोरातवाडी, इंदापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१ वा जयंती महोत्सव साजरा*



*"मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेच्या वतीने थोरातवाडी, इंदापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३१ वा जयंती महोत्सव साजरा*

         
प्रतिनिधी इंदापूर
शशिकांत सोनटक्के

     "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेच्या वतीने गुरुवार दि.१४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजता थोरातवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरज वनसाळे यांच्या हस्ते नीलध्वजारोहन करण्यात आले.त्याचप्रणाणे तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पुजा करुन सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले.
         यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज वनसाळे, संघटनेचे राजशिष्टाचार सदस्य आप्पासो कदम, संघटनेचे तालुका युवक अध्यक्ष अजय फले, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ भोसले, संघटनेचे शाखा अध्यक्ष दत्तात्रय राक्षे,महेश पिसे, बुध्दभुषण राक्षे, अक्षय फले,आयुब मुलाणी ,आयान शेख,राजेश राक्षे,लखन अवचर, सचिन धनवडे, युवराज राक्षे, सुनील धनवडे, महादेव, धनवडे,बाळु सानप, सौ.सविता राक्षे,सौ.आम्रपाली धनवडे,सौ.स्वप्नाली धनवडे,म्हाळाप्पा धनवडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
     थोरातवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव दोन दिवस "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा