Breaking

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर*➡️ रक्तदान शिबीरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद .➡️ १०१ नागरिकांने केले रक्तदान


*विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर*

➡️ रक्तदान शिबीरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद .
➡️ १०१ नागरिकांने केले रक्तदान


चिखली प्रतिनिधी -
 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने मोहोळ तालुक्यातील मौजे चिखली येथे अमर भिम तरूण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते . यात १०१ नागरिकांनी सहभाग नोंदवून समाजापुढे एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे .
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमर भिम तरूण मंडळाच्या वतीने दिनांक १४ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . प्रथम  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थी सेनेचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करून या रक्तदान शिबीराला सुरूवात करण्यात आली . या शिबीरात १०१ रक्तदात्याने आपला सहभाग नोंदविला असून अमर भिम तरूण मंडळाने रक्तदान शिबीराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे . यावेळी सरपंच बाळू मेंढे . ग्रामपंचायत राजाराम सिरसट . माजी तंटामुक्त अध्यक्ष हनुमंत सिरसट . पोलिस पाटील विठ्ठल मते . सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेना उपाध्यक्ष संतोष मते . अमोल गवळी ( अध्यक्ष ) . रोहित कासवेद ( उपाध्यक्ष ) ‌‌. राजन सिरसट . अनिल सिरसट . गोविंद सिरसट . अक्षय यादव . कल्याण यादव . हरिभाऊ शिंदे . मयूर मोरे . बाळासाहेब माने . मुकींद पाटील . संभाजी पाटील . आबासाहेब शिंदे . संतोष सिरसट . तानाजी सिरसट . सुर्यभान गवळी . संदीप जगताप . अक्षय सिरसट . बाळू सिरसट . बालाजी मते . सुधाकर गवळी . महाविर कारंडे . सुधाकर कारंडे . संजय सिरसट . मुकींद सिरसट . नवनाथ (नाना ) मते . हणमंत चौधरी  ‌ दता माळी . इत्यादी मान्यवर सह कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा