Breaking

बुधवार, २० एप्रिल, २०२२

हरवलेल्या अल्पवयीन मुलीचीमाहिती देण्याचे शिराढोन पोलिसांचे आवाहन,



हरवलेल्या अल्पवयीन मुलीची
माहिती देण्याचे शिराढोन पोलिसांचे आवाहन,


 प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.

उस्मानाबाद.दि.20, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रांजणी  येथील अल्पवयीन मुलगी पुनम दगडु डाकुरे वय वर्ष तेरा हीचे दिनांक 05 फेब्रुवारी 2022 रोजी त्याच गावातील खंडू बबन डाकुरे वय वर्ष 20 याने दुपारी 01.30 च्या सुमारास तिच्या राहत्या घरातून अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची तक्रार शिराढोण येथील पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. तिचा शोध घेतला असता आजपर्यंत ती आढळून आलेली नाही. त्या मुलीचे वर्णन तक्रारदार फिर्यादीवरुन  उंची 4 फुट 5 इंच, रंग-सावळा, भाषा-मराठी, गोल-चेहरा, सडपातळ-शरीर, सरळ-नाक, पोषाख-अंगात लाल टॉप आणि गुलाबी लेगिन्स तसेच केशरी रंगाचा स्टॉल अशा प्रकारचे आहे.

वरील वर्णनाची अल्पवयीन मुलगी कोणास आढळून आल्यास शिराढोण पोलिस ठाणे दुरध्वनी क्र.02472-222700 तसेच तपासणी अधिकारी जी.व्ही.गोडसे मो.नं.9518523279 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन शिराढोण पोलिस ठाणे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा