*सैनिक फेडरेशन शाखा तुळजापूर च्या वतीने माजी सैनिकांना श्री तुळजाभवानी मंदिरात डायरेक्ट दर्शन देण्यात यावे, या मागणीसाठी, तालुका अध्यक्ष श्री दत्ता नवगिरे यांचे तहसीलदार यांना निवेदन*
*आजी व माजी सैनिकांना, व त्यांच्या कुटुंबीयांना श्री तुळजाभवानी मंदिरात डायरेक्ट दर्शन देण्यात यावे,या मागणीसाठी सैनिक फेडरेशन शाखा तुळजापूर च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
सैनिक फेडरेशन शाखा तुळजापूरच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट तुळजापूर, तहसीलदार कोल्हे मॅडम यांना आज दिनांक,२० एप्रिल २०२२,रोजी निवेदन देण्यात आले,या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर हे साडेतीन शक्तिपीठा पैकी एक आहे, येथे देशभरातून आजी व माजी सैनिक त्यांच्या कुटुंबीयांसमवेत दर्शनासाठी येत असतात, सदर दर्शनासाठी खूप त्रास सहन करावा लागतो, व माजी सैनिकांची कोणत्याही प्रकारची मंदिरात दखल घेतली जात नाही, या आजी व माजी सैनिकांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत श्री भवानीमातेचे दर्शन स्पेशल पास द्वारे,थेट दर्शनाची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, त्यामुळे भारत देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना याचा लाभ देण्यात यावा,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या निवेदनावर माजी सैनिक फेडरेशनचे तुळजापूर तालुका अध्यक्ष श्री दत्ता नवगिरे, सैनिक फेडरेशन तालुका संघटक श्री प्रकाश भांजी यांची स्वाक्षरी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा