राज्यात उष्णतेची लाट . विजेची बचत करा*
➡️ महावितरण कडून आवाहन
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू आहे . त्यामुळे विजेच्या मागणीत विक्रमी वाढ झालेली आहे . वीजबिलांच्या बचतीसाठी तसेच सद्यास्थितीत मागणी देखील वाढत असल्याने वर्गवारीतील विजग्राहकांनी आवश्यकतेनुसारच वीज वापर करावा . विशेषत ; सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा कमीतकमी वापर करून सहकार्य करावे . असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे .
विजेच्या बचतीसाठी घर किंवा कार्यालय मध्ये भरपूर असलेल्या सुर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा ज्यावेळी उपयोगात नसतील तेव्हा घरातील विद्युत उपकरणे व लाईट बंद करणे आवश्यक आहे . वीजबिलात वाढ करणार्या उपकरणांमध्ये पंखे . एअर कंडिशनर . गीझर . वाॅशिंग मशीन . इस्त्री . रेफ्रिजटेर . मायक्रोव्हे . ओव्हन . ज्युसर . फूड प्रोसेसर . मिक्सर . ग्राइंडर . काॅम्प्युटर . चार्जर . व्हॅक्यूम क्लीनर . अशा उपकरणांचा समावेश होतो . ही उपकरणे वीज बचतीच्या जाणिवेने वापरत आणली तर निश्चितच वीज बचतीला मोठा वाव आहे . उन्हाळ्यात फ्रीजमधून एकेक भाजी किंवा थंड पदार्थ एकदाच काढावेत . दरवाजा सतत उघडावा लागला तर फ्रीजमधील तापमान वाढत जाते आणि विजेचा वापर जास्त होतो . टीव्ही . डिस टिव्ही . संगणक आदी उपकरणे रिमोट कंट्रोल ऐवजी थेट स्विच बोर्डापासून बंद केला तर विजेची बचत होऊ शकते . एसीला पंख्यापेक्षा नऊपट अधिक वीज लागते . त्यामुळे एसीची गरज नसल्यास शक्यतो पंखाच वापरावा . एसी वापरायचा असल्यास नियमितपणे त्याचे फिल्टर तपासणे स्वच्छ करणे . एसी सुरू असताना दरवाजे . खिडक्या व्यवस्थित बंद करणे आवश्यक आहे . गारवा निर्माण झाला की शक्य असल्यास एसी बंद करावा . स्मार्ट मोबाईल . लॅपटॉप . टॅबला सतत चार्जिंग करावे लागते . त्यामुळे या वस्तुंचे चार्जिंग झाल्यानंतर चार्जिंगचे बटन बंद करण्याचा कंटाळा करू नये . तसेच इमारतीमध्ये दोन लिप्ट असल्यास एखादी एखादी लिप्ट लवकर येईल म्हणून दोन्ही लिप्टचे बटन दाबले जातात . त्यापेक्षा ज्या लिप्टचे बटन दाबले ती लिप्ट येईपर्यंत प्रतीक्षा करावी असे अनेक विध उपाय करून वीजबचतीला हातभार लावावा . असे आवाहन महावितरणने केले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा