अंजली सुरवसे खून प्रकरणातील तीन आरोपी अटकेत... 11 मे पर्यंत पोलीस कोठडी --- पो. नि. निंबाळकर
टेंभुर्णी प्रतिनिधी: मिटकलवाडी ता माढा येथिल अंजली हनुमंत सुरवसे हिच्या खून प्रकरणातील फरार असणाऱ्या ५ आरोपींपैकी ३ आरोपीनी बेड्या ठोकण्यत टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या पथकाला यशा आले आहे अशी माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निंबाळकर यांनी दिली.
.
या प्रकरणातील आरोपी अंजली थिटे हिला ८ मे रोजी सांगोला तालुक्यातील दहिटणे येथून अटक केली तर दीर वैभव सुरवसे व सासू अन्नपूर्णा सुरवसे यांचा बीड व लातूर परीसरात शोध घेऊन आज अटक करण्यात आली. या प्रकरणी पती हनुमंत सुरवसे सह ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता 11 में पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून अद्याप २ आरोपी फरार असून त्यांचा तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सुरू आहे.
अंजली सुरवसेच्या मृत्यूला प्राथमिक स्वरूपी आत्महत्याचे स्वरूप होते, परंतु शवविच्छदन अहवालात आत्महत्या नसून खून असल्याचे सिध्द झाल्यानंतर आरोपींवर खूनाचे कलम लावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी पोलीस ठाणाच्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोपींचा शोध घेण्यासाठी अंजलीच्या नातेवाईकांसह अनेक सामाजिक संघटनांनी दबाव आणला होता. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विशाल हिरे व पो नि सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशील भोसले व पीएसआय काशीद, स फौ गुटाळ, पोहेका पर्वते, पोहेका तांबोळी, पोहेका शिंदे, पी एन शेळके, पीएन साठे, पीएन झोळ, पोका कांबळे, पोका माने देशमुख, पोका सरडे यांनी आरोपींना अटक करण्यासाठी विशेष कामगिरी बजावली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा