वाकेश्वर सोसायटीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलची सत्ता अबाधित
वडूज प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील वाकेश्वर सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने १३ पैकी १३ जागा जिंकून आपली सत्ता अबाधित ठेवली. या पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे.
सर्व साधारण गट सतीश गोरखनाथ फडतरे ( २३९ ), शशीकांत निवृत्ती फडतरे ( २३७ ), रामदास दौलत फडतरे ( २३१ ), राहूल रामराव फडतरे ( २३१ ), विठ्ठल दशरथ फडतरे ( २३० ), योगेश सहदेव तुपे ( २२२ ), बाळासो जगन्नाथ फडतरे ( २२१ ), राजाराम मुगुटराव फडतरे ( २२० ), महिला राखीव गट - रंजना मुरलीधर फडतरे ( २५५ ), कलावती व्यंकट फडतरे ( २४२ ), इतर मागास प्रवर्ग - सुभाष राघू दळवी ( २२७ ), अनुसुचित जाती जमाती प्रवर्ग - जयसिंग गुलाब जावीर ( २४४ ), विमुक्त जाती भटक्या जमाती मागास प्रवर्ग - सुभाष शिवाजी कोळी ( २३१ ) यांचा समावेश असून विरोधी पॅनेलच्या उमेदवारांचा शंभर मताच्या फरकाने पराभव केला.
निवडणुक निकालानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांची गावातून मिरवणुक काढून भैरवनाथ मंदिरात मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी कोरेगाव - खटावचे आ. महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख सोपान पाटील ( आबा ) म्हणाले, आमच्या पॅनेलची ३० वर्षाच्या सत्तेची परंपरा आम्ही कायम ठेवली असून आ. महेश शिंदेसाहेब व गावातील जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत व सोसायटीच्या माध्यमातून तसेच सातारा जिल्हा बँकेच्या सहकार्याने ब वर्गात असलेली सोसायटी अ वर्गात आणणे, सर्व सभासदांना वेळेत सर्व प्रकाराचे कर्जवाटप करून वेळेत कर्ज वसूली करून लांभांस देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. गावासाठी अत्यंत फायदेशीर असलेला वाकेश्वर - कुरोली साडेपाच कि मी चा रस्ता आ. शिंदेसाहेबाच्या माध्यमातून मार्गी लावणार असून सोसायटी निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकासाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी अहोरात्र झटलेल्या सर्व मतदार बंधू -भगीनीचे, सभासद, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांचे आभार मानले.
सरपंच ताराबाई राऊत, उपसरपंच संगिता फडतरे, ग्रा प सदस्य शिवाजी फडतरे, विलास फडतरे, सदस्या रेणुका फडतरे, रेखा साठे, अंकुश फडतरे, अतुल राऊत, मा.चेअरमन डॉ. हणमंत फडतरे, दिलीप फडतरे, पॅनेलचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, आजी - माजी सैनिक संघटना यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो -
वाकेश्वर - सोसायटी निवडणूकीत विजयानंतर जल्लोष करताना भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे नवनर्वाचित संचालक व कार्यकर्ते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा