“चालक पोलीस शिपाई भरती सन- 2019 संदर्भाने उमेदवारांस सुचना.”
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
उस्मानाबाद जिल्हा पोलीस दल आस्थापनेवरील ‘वाहन चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रीया सन- 2019’ ची दि. 04.02.2022 रोजी प्रसिध्द करयात आलेली ‘तात्पुरती निवड यादी’ रद्द करण्यात आली असून ‘सुधारीत तात्पुरती निवड यादी’ ही osmanabadpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. ही यादी सुध्दा निवळ तात्पुरत्या स्वरुपाची असून त्यामध्ये कोणताही बदल होउ शकतो.
या ‘सुधारीत तात्पुरती निवड यादी’ वर उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास त्यांनी पोलीस कल्याण विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, उस्मानाबाद येथे शुक्रवार दि. 13.05.2022 रोजी सायंकाळी 16.00 वा. पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष हजर राहून लेखी आक्षेप नोंदवावेत. त्यानंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नसून त्यानंतर अंतीम निवड यांदी प्रसिध्द केली जाणार आहे. असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत यांनी उमेदवारांस केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा