भरधाव मालट्रकची धडकेमुळे सोलापूर-हेद्राबाद रोडवर नऊ तास वाहतूक ठप्प
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग:- भरधाव मालट्रकची जोरदार समोरासमोर धडक होवुन झालेल्या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग घाटात बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. यामुळे तब्बल नऊ ते दहा तासापासुन वाहतुक ठप्प झाली आहे. दरम्यान महामार्गावर दुर्ताफा वाहनाची मोठ्या रांगा लागल्याचे दिसुन आले.
सोलापूरहुन हैद्राबादकडे तुरदाळ घेवुन जाणारा ट्रक (क्र.के.ए.३२ सी २६११) हा
महामार्गावरील नळदुर्ग शहरातील घाटात हनुमान मंदिराजवळ आला असता विरुध्द दिशेनी म्हणजे हैद्राबादहुन नळदुर्ग मार्गे गुजरातकडे साळीचे धान्य घेवुन जाणारा ट्रक (क्र.जी .जे.३६ व्ही ३६५५) यांच्यात समोरा समोर जोरदार धडक होवुन आपघात झाला. या आपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. आपघातानंतर महामार्गावरील संपूर्ण वाहतुक कोलमडली. घटनास्थळी नळदुर्ग महामार्ग पोलिस केद्राचे साहय्यक पोलिस निरीक्षक यु.टी. राठोड, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत कवले, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे, सुधीर मोटे, पिराजी तायवडे, आदीसह पोलिस कर्मचारी वाहतुक सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. रस्ता मोकळा करण्यासाठी सुरुवातीस एका क्रेनने काम सुरु केले. तुळजापूरहुन दुसरा क्रेन मगवण्यात आले. तब्बल नऊ तासानंतर वाहन काढण्यात पोलिसाना यश आले. दरम्यान परप्रातांतील वाहनचालक व प्रवाशी अडकुन पडले होते.
नळदुर्ग शहाबाहेरुन बायपास रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासुन सुरु आहे. माञ सुस्त प्रशासन व संबधित विभागाचे उदासीन आधिकाऱ्यामुळे हे काम अर्धवट रेंगाळत पडले आहे. या आपघातामुळे प्रवाशी रुग्ण, नागरिकांना नाहकच मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान लोकप्रतिनिधीनी याकडे गांभिर्याने लक्ष घालुन महामार्ग रस्त्याचे काम पुर्ण करावे, त्याचबरोबर रस्त्याचे काम पुर्ण होईपर्यंत या मार्गावरील टोलनाका बंद करण्याची मागणी नागरिकातुन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा