Breaking

गुरुवार, १२ मे, २०२२

चोरीच्या मालासह तीघे 24 तासांत ताब्यात.”



चोरीच्या मालासह तीघे 24 तासांत ताब्यात.”


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


स्थानिक गुन्हे शाखा : घाटंग्री शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दरवाजाच्या अंदाजे 90- 100 कि.ग्रॅ. वजनाच्या 12 लोखंडी पाट्या दि. 23.04.2022 ते 11.05.2022 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या होत्या. यावरुन शाखा अभियंता, लघु पाटबंधारे विभाग - रावसाहेब पिंपळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. येथे गु.र.क्र. 70/2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- शैलेश पवार, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, शैला टेळे, पोकॉ- योगेश कोळी, पठाण यांच्या पथकाने गतीमान तपास केला. यातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साठे चौक, उस्मानाबाद येथील कैलास सिताराम पारडे, वय 45 वर्षे यांसह अन्य दोघांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीच्या मालासह गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन जप्त करुन त्यांच्या उर्वरीत साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा