*अमृत जवान अभियान 2022,राबविणे बाबत सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका अध्यक्ष दत्ता नवगिरे यांचे तहसीलदार यांना निवेदन*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
आज दिनांक,११ मे,२०२२ रोजी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये अमृत जवान अभियान २०२२ सुरू झालेले आहे,तरी सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका तर्फे आपणास विनंती करतो की आपल्या तुळजापूर तालुक्यामध्ये अमृत जवान अभियान २०२२, सुरू करण्यात यावे,यामध्ये अजी माजी सैनिक, शहीद जवान, व सेवेत कार्यरत असलेले सैनिक, व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्यासाठी या अमृत जवान अभियान २०२२ ची मदत होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या निवेदनावर सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका अध्यक्ष श्री दत्ता मधुकर नवगिरे यांची स्वाक्षरी आहे.यावेळी अध्यक्ष श्री दत्ता नवगिरे , तालुका संघटक श्री प्रकाश भांजी , श्री विठ्ठल मसाजी लोखंडे.
यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा