राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त चांदापूरी येते 80रक्तदात्यांचे रक्तदान
![]() |
राजमाता अहिल्यादेवी होळकर व धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमांचे पूजन करतांना चेअरमन भजनदास चोरमले अभिजित जाधव, डॉ.निलेश चोरमले, विलास चोरमले संतोष कोपनर दत्तात्रेय पाटील संतोष कोळेकर आदि मान्यवर |
पिलीव aj 24taas News वृत्तसेवा
माळशिरस तालुक्यातील चांदापूरी येथीलशेतकरी राजा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, महाराज व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची संयुक्त जयंती निमित्त चांदापूरी येथील जयंती उत्सव समिती च्यावतीने चांदापूरीयेथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीराचे उद्घाटन शेतकरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भजनदास चोरमले यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व धर्मवीर छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला.यावेळी चेअरमन भजनदास चोरमले, उपसरपंच संतोष कोपनर अभिजीत जाधव संस्थापक अध्यक्ष शेतकरी राजा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य विलास नाना चोरमले शंकर पूकळे दत्तात्रय पाटील डॉ.निलेश चोरमले संतोष कोळेकर राजू वाघ व मान्यवर सदस्य उपस्थितीत होते.यावेळी अक्षय ब्लड बँक सोलापूर यांच्या डॉक्टर व कर्मचारी यांनी रक्तसंकलन केले.तर उत्स्फूर्तपणे 80 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी शेतकरी राजा फौंडेशनच्या सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा