Breaking

सोमवार, २३ मे, २०२२

अवैध रित्या धंदे जोरात पण पोलीस यंत्रणा गप्प......



अवैध रित्या धंदे जोरात पण पोलीस यंत्रणा गप्प......



श्रीगोंदा-नितीन रोही,

तालुक्यातील प्रत्येक रोडवरील हॉटेलांमध्ये खुलेआम दारू विक्री,होताना दिसते. तर चक्क काही ठिकाणी वेश्या व्यावसाय होताना दिसतो पण पोलीस यंत्रणा कारवाई करताना दिसत नाही, त्यामुळे पोलीस यंत्रनेवर प्रश्न चिन्ह निर्माण होते. आणि त्यामुळे च नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. तसेच मोठ मोठ्या गावांत चालतोय मटका,सोरट त्याच प्रमाणे दारू, वाळू, मुरूम,वेश्या व्यवसायां सह अनेक ठिकाणी अवैध धंदे बऱ्याच प्रमाणावर तालुक्यात चालू आहेत, पण पोलीस व महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.

 तालुक्यात व शहरात असणाऱ्या काही ठिकाणी टपरी मध्ये किंवा खोल्यांमध्ये अवैध व बेकायदेशीर मटका आणि सोरट,वेश्या व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असतो.तरी ही पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत.

चौकट,

पोलीस व महसूल विभाग कारवाई का करीना.....

आश्चर्य....

काही नागरिकांमध्ये चर्चा चालू असते की पोलीस व महसूल विभाग यांचे या धंद्यावाल्यां सोबत नक्कीच आर्थिक दृष्ट्या लागे बांधे असले पाहिजे. त्यामुळेच प्रसिद्धी देऊन सुध्दा उपोयोग होईना असे काही नागरिक बोलतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा