Breaking

शुक्रवार, ६ मे, २०२२

वडुज न्यायालयाने आ गोरे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने आ गोरे यांचे डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम


वडुज न्यायालयाने आ गोरे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने आ गोरे यांचे डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम




म्हसवड प्रतिनिधी AJ 24 Taas News Maharastra Network


**************************************

भाजपाचे जिल्हा अध्यक्ष व माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरें यांचा वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्याने आ गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आसुन  आ गोरे यांना   अटक होणार कि   उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणा याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे


     मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासंदर्भात भाजप आमदार जयकुमार गोरे  यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली यावेळी वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे जयकुमार गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
.
सातारा जिल्ह्यातील मायणी येथील मृत भिसे या व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे आणि महेश पोपट बोराटे यांच्यासह अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून महादेव पिराजी भिसे यांनी या प्रकरणी तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दिली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा