Breaking

गुरुवार, ५ मे, २०२२

जोमेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी परायण सोहळ्याचे आयोजन



जोमेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी परायण सोहळ्याचे आयोजन



नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

लोहा:- प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी लोहा तालुक्यातील जोमेगाव येथे ह.भ.प.वै.परमपूज्य मामासाहेब महाराज मारतळेकर यांच्या कृपाशिर्वादाने व ह.भ.प.गुरुवर्य मधुसूदन महाराज कापशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दि.६ मे २०२२ रोज शुक्रवार ते दि.१३ मे २०२२ रोज शुक्रवार पर्यंत आयोजित केला आहे.
या सप्ताहात मराठवाड्यायील नामवंत कीर्तनकरांचे हरी कीर्तन होणार असून यात हभप इंजि.प्रवीण महाराज पिंपळदरीकर ,हभप परमेश्वर महाराज सोमसवाडीकर,हभप मैनाताई हिप्परनाळीकर,हभप त्र्यंबक आप्पास्वामी नंदगावकर,हभप व्यंकट महाराज दगडवाडीकर,हभप चंद्रकांत महाराज लाठकर ,हभप विश्वनाथ  महाराज काकांडीकर,तर काल्याचे कीर्तन गुरुवर्य भागवताचार्य ह-भ-प मधुसूदन महाराज कापशीकर यांचे होणार आहे, यासाठी गायनाचार्य ह भ प संगीत विशारद रोहिदास माटेगावकर,संतोष तेलगावकर मृदंगाचार्य विश्वजीत रेगावकर  चोपदार अशोक वडजे उमरेकर विणेकरी विश्वनाथ मारतळेकर हे उपस्थित राहणार आहेत.तर सदर कीर्तन सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकडा आरती काकडा भजन  सकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण दुपारी १० ते १२ गाथा भजन दुपारी ३ ते ४ भावार्थ रामायण कथा सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ९ ते ११  हरीकिर्तन व नंतर जागर होईल.या वेळात सर्व कार्यक्रम होणार आहेत.यासाठी जोमेगाव परिसरातील भावीक भक्तांनी उपस्थित राहून हरिनाम कीर्तनाचा व महाप्रदाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी जोमेगाव यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा