राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रमजान ईद निमित्त १५० गरीब मुस्लिम कुटूंबाना दुधाचे वाटप
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग:- नळदुर्ग शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद (पिंटू) पुदाले यांनी दि.२ मे रोजी पवित्र रमजान ईद निमित्त शहरांतील गरीब १५० मुस्लिम कुटुंबांना मोफत दुध वाटप केले. आनंद पुदाले यांच्या या सामाजिक भावनेतुन केलेल्या कामाचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.
सध्या बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आशा वेळी गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना सण, उत्सव साजरा करणे अवघड जात आहे. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. रमजान ईद गरिबांच्याही घरी साजरी व्हावी हा उदात्त हेतु डोळ्यासमोर ठेऊन नळदुर्ग शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद (पिंटू) पुदाले यांनी दि.२ मे रोजी रात्री ८ वा शहरांतील मुस्लिम समाजातील गरीब १५० कुटूंबाना प्रत्येकी तीन लिटर दुध मोफत वाटप केले. किल्ला गेट येथे शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात दुध वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर आनंद पुदाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक गरीब मुस्लिम कुटुंबाच्या घरापर्यंत जाऊन त्यांना दुधाचे वाटप केले.
या दुध वाटप कार्यक्रमास नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे सचिव सुनिल गव्हाणे, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी नाईक पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, अजित चव्हाण, एकबाल शेख, अजीम काझी, एम. आय. एम. चे शहर अध्यक्ष गौस रजवी, खाजु फारुकी, खलीलसाब शेख, अतिक शेख, बकर भाई, इसाक शेख, आमिर काझी, अफझल कुरेशी, अफझल रजवी, सादिक शेख, इनामदार, इमरान पठाण, शमशुल्ला काजी, निखिल शहा, सज्ज्याद काजी यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा