ग्रामीण भागातील महिलांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे-सरपंच संगिता पाटील
टेंभूर्णी प्रतिनिधी
उजनी टे तालुका माढा येथील वंदना सतिश पाटील यांनी शंभुराजे फ्रुट पॅकेजिंग या व्यवसाय सुरू केला.याचे उद्घाटन उजनी टे च्या सरपंच सौ संगिता शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रामीण भागातील महिलांनी स्वतः च्या पायावर उभे रहावे व स्वकर्तृत्व सिध्द करावे शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करत असते महिलांनी योजनांचा फायदा करून घ्यावा असे सरपंच संगिता पाटील म्हणाल्या.
यावेळी सरपंच संगिता पाटील,शिवाजीराव पाटील, सतिश पाटील,प्रदीप पाटील,उञेश्वर पाटील,खंडू पाणबुडे,रोहन पाटील,वंदना पाटील,कालिंदा पाटील,ज्योती पाटील,शारदा पाटील,मृणाली पाटील,प्रमिला बाबर,अनिता पाटील,सुशिला पाटील,उज्वला पाटील,जनाबाई जाधव,मयुरी मेटे पाटील,आशा पानबुडे,नम्रता पाटील,गायञी पाटील आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा