जनविकास फाउंडेशन च्या वतीने वैभव शिंदे यांचा सत्कार
टेंभुर्णी प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये राज्यात सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले निमगाव(टें) चे व पत्रकार भाऊराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव भाऊराव शिंदे यांचा सन्मान टेंभुर्णीतील कुर्डूवाडी चौक या ठिकाणी जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी
रयत क्रांती संघटनेचे जिल्हा समन्वयक विठ्ठल मस्के, टेंभुर्णी येथील तिसऱ्या आघाडीचे नेते रामभाऊ शिंदे, रोहित हायटेक नर्सरी चे धनंजय महाडिक, पोलीस कॉन्स्टेबल संजय पांडेकर, जनविकास फाउंडेशनचे सदस्य भालचंद्र जोरवर -पाटील, ॲग्री ओव्हरशल अमोल निकम, अविनाश भोसले, अमर चव्हाण, फकीरसाहेब सय्यद, सचिन क्षिरसागर, राहुल चव्हाण,वैभव चव्हाण,किरण चव्हाण, दत्तात्रय मोरे यांच्यासह टेंभुर्णी परिसरातील अनेक नागरिक व पत्रकार बंधू उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा