Breaking

मंगळवार, १० मे, २०२२

तुळजापुरात रिपाइं आठवले गटाचे तहसील कार्यालयावर निदर्शने व विविध मागण्याचे निवेदन सादर*



*तुळजापुरात रिपाइं आठवले गटाचे तहसील कार्यालयावर निदर्शने व विविध मागण्याचे निवेदन सादर*




प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर  येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)पक्षाचे राष्ट्रीय आध्यक्ष तथा केंद्रीय सामाजीक व विशेष सहाय्य राज्यमंत्री संघर्षनायक डाॅ.रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार तुळजापूर तालुक्याच्या वतीने राज्यव्यापी मागण्यासह  तालुक्यातील विविध मागण्यासाठी मराठवाड्याचे उपाध्यक्ष आनंद पांडगळे, रोजगार आघाडीचे राज्य उपाध्यक्ष संजय शितोळे युवक तालुका सरचिटणीस शुभम कदम जिल्हा जेष्ठ नेते  प्रताप कदम   यांच्या नेतृत्वाखाली भव्य निदर्शने मोर्चा काढण्यात आला होता.

प्रथमता रिपाईचे सर्व पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारील शासकीय विश्रामगृह येथे एकत्र येवून छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मार्गाने तहसिल कार्यालयावर निदर्शने मोर्चा धडकला यावेळी रिपाईचे आनंद पांडगळे, संजय शितोळे, तानाजी कदम, एस.के गायकवाड, बाबासाहेब बनसोडे,शुभम कदम, आदिंची  भाषणं झाली. 


लोहारा तालुक्यातील काणेगाव येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी परवानगी नाकारली, तेथिल बौध्द विहार उघडण्यास बंदी घालण्यात आल्याने तेथिल अंकुश गायकवाड यांने आत्महत्या केली कि त्याची हत्या करण्यात आली याचा तपास करण्यात यावे अरोपातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी. तुळजापूर तडवळा येथिल उडाण पुलास डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले होते ते नाव पुसणा-या जातीयवादी समाजकंटकांवर योग्य कार्यवाही करण्यात यावी तसेच उडाण पुलाचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कायम देण्यात यावे. तुळजापूर (खुर्द)येथिल आदिवासी पारधी समाजाचे अतिक्रमण कायम करून कबाले देण्यात देवून घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावे नळदुर्ग येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा विविध विकास महामंडळाचे कर्जाचे भाग भांडवल वाढविण्यात यावे, आदिंसह विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.


याप्रसंगी शहराध्यक्ष अरूण कदम, युवक शहराध्यक्ष अमोल कदम, युवक तालुकाध्यक्ष विष्णू सोनवणे, उमेश सिध्दगणेश सोमनाथ मस्के आण्णा प्रताप विनोद ढवळे, प्रेम वडवराव, रावण सोनवणे, तानाजी उमाजी कदम, शरद मस्के,जय (चिकू)शितोळे, नितीन सोनवणे, मारूती जेटीथोर, मोनू कसबे, सालम चिमणे, शशिकांत माने बबलु शितोळे, संगमेश्वर साखरे सुहास मस्के, प्रविण सोनवणे जयाजी सोनवणे, संजय बनसोडे, लक्ष्मण लोंढे,कृष्णा लोंढे,शिवाजी कांबळे, सागर गोडवे, राजे वडवराव अक्षय शितोळे, अनिकेत ठोंबरे महाविर सुरते कुमार मस्के राम ठोंबरे, आकाश मस्के, आदिंसह तुळजापूर तालुक्यातील रिपाईचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी रिपाईचे जेष्ठ नेते प्रताप कदम यांनी आभार मानले तर सुत्रसंचालन रावण सोनवणे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा