Breaking

सोमवार, २ मे, २०२२

पत्रकाराला धमकी देणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल, विनापरवाना व बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश लेखमाला प्रकरण...!



पत्रकाराला धमकी देणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल,
 विनापरवाना व बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश लेखमाला प्रकरण...!


श्रीगोंदा:नितीन रोही,

तालुक्यातील  पत्रकार विजय उंडे यांची श्रीगोंदा तालुक्यातील काही खाजगी लुटारू वृत्तीच्या हॉस्पिटल व दवाखान्यांविरोधात गेल्या महिन्यापासून लेखमाला सुरू आहे. या लेखमालेने सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊ लागल्याने धंदेवाईक डॉक्टरांचे धाबे दणाणले होते.


याबात तालुक्यासह अनेक ठिकाणच्या डॉक्टर तसेच त्यांच्या हॉस्पिटलचे बातम्यांच्या माध्यमातून पितळ उघडे पडल्याने तालुक्यातील डॉक्टरांनी आपल्या प्रेमाच्या संबंधातील तसेच मित्र प्रेमाच्या बाहेरच्या जिल्ह्यातील डॉक्टरांना पत्रकाराचा नंबर देऊन धमकावण्यास सांगितले. त्यानुसार तालुक्यासह बाहेरील डॉक्टरांनी पत्रकाराला धमकावले.! याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, श्रीगोंदा तालुक्यातील एका मराठी दैनिकात काम करणाऱ्या पत्रकार विजय उंडे यांनी सरकारी दवाखाना व खाजगी हॉस्पिटल यांच्या गैरकारभाराबाबत मोठ्या प्रमाणात लिखाण केल्याने, तालुक्यातील अनेक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतांश लोकांचे मोठ्या प्रमाणात विषय हाताळले.

यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील शासकीय परवाने, नोंदण्या, परवानग्या नसलेले हॉस्पिटल व वेगवेगळ्या बहाण्याने रुग्णांना लुटणाऱ्या तालुक्यातील कुठलीही नोंदणी नसलेल्या दवाखान्याचे पितळ उघडे पडल्याने, त्याचा मनात राग धरून, तालुक्यातील एका डॉक्टरने आपल्या क्षेत्रातील पण जिल्ह्याबाहेरील डॉक्टरांना पत्रकार विजय उंडे यांचा मोबाईल नंबर दिला व सांगितले की, या पत्रकाराला पोलिसात जाण्याची, तसेच प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्याची, भेटेल तिथे मारहाण करण्याची, मोबाईल वरून बाहेरच्या जिल्ह्याबाहेरील काही गुंड प्रवृत्तीच्या डॉक्टरांनी उंडे यांना धमक्या दिल्याप्रमाणे तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकारांनी निषेध सभा घेत, दोषी डॉक्टरांवर 2 मे 2022 रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

*आंधळा डॉक्टर झाला कसा ?*


श्रीगोंदा तालुक्यातील विविध दवाखान्यात काही दिवस पगारी डॉक्टर ठेवतात. मात्र, काही दिवसानंतर तो डॉक्टर हॉस्पिटल मधून गायब होतो. त्या पगारी डॉक्टरच्या नावावर स्थानिक विनापरवाना डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय हे दवाखाने चालवतात. त्यामुळे तालुक्यातील वैद्यकीय सेवा आंधळी झाली असून, हा आंधळा डॉक्टर झालाच कसा? असा प्रश्न नागरीकातून उपस्थित केला जात आहे.


चौकट,


नागरीकातून खाजगी डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणात रोष....


कोरोना काळात खाजगी डॉक्टरांकडून रुग्णाच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात फसवून केल्याचे लोकांना  बातम्यांच्या माध्यमातून समजू लागल्याने, आतापर्यंत खाजगी रुग्णालयाने आपल्याला किती लुटले आहे.! नागरिकांच्या लक्षात आल्याने, नागरीकातून मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होताना दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा