“चोरीच्या रकमेसह दोन महिला अटकेत.”
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापुर पोलीस ठाणे : मुंबई येथील आशा सोना मगर या दि. 03.05.2022 रोजी 14.30 वा. सु. तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदीरा देर्शनासाठी गेल्या असता गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील 2,330 ₹ रक्कम चोरुन नेली. यावर श्रीमती आशा मगर यांनी पोलीसांकडे धाव घेतली असता पोलीसांनी मंदीरातील सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण केले असता चोरी करतांना दोन महिला दिसुन आल्या. पोलीसांनी त्यांच्याकडे धाव घेउन त्यांची नावे विचारली असता त्यांनी प्रियंका करण उपाध्य व मैनाबाई किसन उपाध्य, दोघी रा. कुलबर्गी, राज्य कर्नाटक असे सांगीतले महिला पोलीसांच्या मदतीने त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ नमूद चोरीची रक्कम मिळुण आल्याने पोलीसांनी त्या दोघींना ताब्यात घेतले. यावर आशा मगर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा