Breaking

बुधवार, ४ मे, २०२२

सामाजिक सलोखा राखत मंगरूळ येथे रमजान ईद साजरी****मारुती मंदिरात सर्वच ग्रामस्थांना शिरखुमा वाटप**



सामाजिक सलोखा राखत मंगरूळ येथे रमजान ईद साजरी**
मारुती मंदिरात सर्वच ग्रामस्थांना  शिरखुमा वाटप**



**मुस्लिम युवकांचे या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल विशेष कौतुक**

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


मंगरूळ  :- महाराष्ट्र राज्यात सध्या काही राजकीय व्यक्तीकडून बेताल वक्तव्ये करून समाजासमाजा मध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असून अशा या बेताल वक्तव्य करून तेढ निर्माण करणाऱ्यांना तुळजापूर तालुक्यातील मौजे मंगरूळ ग्रामस्थांनी  रमजान ईद हा सण एकत्र येत  साजरा करून जबरदस्त चपराक दिली आहे व परत एकदा सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले आहे भोंग्या सारख्या विषयाने वातावरण तापले असताना मंगरूळ हे गाव कायम भाईचारा राखण्यासाठी अग्रेसर असते हे परत एकदा सिद्ध केले 
    याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवार ३ मे रोजी रोजी ईद उल फित्र म्हणजे रमजान ईद हा पवित्र सण जगभर साजरा करण्यात आला परंतु मंगरूळ ग्रामस्थांनी हा सण जगावेगळा साजरा केला सकाळी ९ वाजता मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केल्यानंतर गावातील सर्वच जाती धर्मातील ग्रामस्थांनी  ईदच्या एकमेकांस गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या ईदगाह मैदानापासूनते गावापर्यंत  शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली  त्यानंतर मुख्य बाजार चौकातील मारुती मंदिरात शिरखुमा व स्नेह भोजनाचे आयोजन मुस्लिम युवकांच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले याचा आस्वाद गावातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांनी घेतला  यात डाळ भात , गुलगुले व शिरखुमा याचा मनमुराद आस्वाद घेतलेल्या नागरिकांनी मुस्लिम समाजातील युवकांचे विशेष कौतुक केले या सर्व कार्यक्रमासाठी मुस्लिम समाजातील  युवकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा