उमरा येथे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
ह.भ.प.इंजि.प्रविण महाराज पिंपळदरीकर यांचे किर्तन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा : संभाजी ब्रिगेड शाखा उमरा आयोजित स्वराज्यवीर स्वातंत्रवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव व भव्य कीर्तन सोहळ्याचे उमरा येथे दि.१४-मे-रोजी आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संभाजी ब्रिगेड शाखा उमरा व समस्त गावकरी मंडळी उमरा यांच्या वतीने दि.१४-मे-रोजी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.सकाळी ठीक १० वा छत्रपती संभाजी महाराज चौकात ध्वजारोहण मा.स्वप्नील पाटील उमरेकर यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुराव पाटील सिरसाट उद्घाटक मा.मोहनराव पाटील सिरसाट,प्रमुख पाहुणे सुभाषराव पाटील कोल्हे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नांदेड,मा.भास्करराव पाटील जोमेगावकर सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेड,डी.एच.देशपांडे ग्रामपंचायत प्रशासक उमरा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होईल.
तसेच सायं.७ वाजता ह.भ.प.इंजि.प्रवीण महाराज पिंपळदरीकर युवाकीर्तनकार कथा समाजप्रबोधनकार यांचे भव्य कीर्तन आयोजित केले आहे.तरी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव व किर्तन सोहळ्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेड शाखा उमरा व समस्त गावकरी मंडळी उमरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा