Breaking

बुधवार, ११ मे, २०२२

औसा शहरात 'लोकनेते विलासरावजी देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप' चे आयोजन*..


*औसा शहरात 'लोकनेते विलासरावजी देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप' चे आयोजन*...



*AJ 24Taas News /औसा ज्ञानेश्वर सूर्यवंशी*

लातूर : आमदार श्री. धिरज विलासरावजी देशमुख यांच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमी तरुणांसाठी आता 'लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण- टी 10' ही भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 13 ते 26 मे 2022 या कालावधीत तालुका व जिल्हास्तरावर ही स्पर्धा रंगणार आहे. यासाठी जिल्ह्यातील क्रिकेट संघांना 12 मे 2022 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७७ व्या जयंतीचे औचित्य साधून लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप संयोजन समितीच्या वतीने ही स्पर्धा आयोजिण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा