Breaking

शनिवार, १४ मे, २०२२

बेकायदेशीर लिंग परीक्षण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश....


बेकायदेशीर लिंग परीक्षण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश....



इंदापूरचे वैद्यकीय पथक व इंदापूर पोलिसांची संयुक्त कारवाई

-------------------------------------------------------------

    प्रकाश आरडे/इंदापूर प्रतिनिधी


****************:::::******************
दि. १३ मे  रोजी इंदापूरच्या वैद्यकीय पथकाने पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे ही कारवाई इंदापूरचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संतोष खामकर व इंदापूरचे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने झाली


                   वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संतोष खामकर यांना मिळालेल्या माहितीवरून इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक बलेनो कार MH -CG - 8016 या चारचाकी गाडीमध्ये काही लोक फिरून गर्भवती महिलांची बेकायदेशीरपणे गर्भाचे लिंग परीक्षण करीत आहेत. आशा माहितीवरून सदरची कारवाई करण्यासाठी डॉक्टर संतोष खमकर यांनी इंदापूर पोलिसांची मदत घेतली या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. 
                    संशयित बलेनो कारचा शोध घेतला असता ही कार मौजे सुरवड येथील भांडगाव रोड जवळ थांबलेली दिसली त्याच वेळी छापा टाकला असता संशयित कार मध्ये दोन इसम एका गर्भवती महिलेचा गर्भ तपासणी करताना आढळून आले त्या इसमांची नावे १) प्रवीण पोपटराव देशमुख वय ३२ वर्ष रा. राजाळे तालुका फलटण जिल्हा सातारा
२) तौशिक अहमद शेख वय ३० वर्ष रा. राजाळे तालुका फलटण जिल्हा सातारा असे सांगितले सदर कार मध्ये लिंग परीक्षण करणाऱ्या दोन मशीन दोन मोबाईल व इतर वैद्यकीय साहित्य मिळाले ते सर्व साहित्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संतोष खामकर उपजिल्हा रुग्णालय इंदापूर यांनी पंचांसमक्ष जप्त केले
ताब्यात घेतलेल्या इसमाकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी असे सांगितले की, कोळेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील डॉक्टर सुशांत हनुमंत मोरे व डॉक्टर हनुमंत ज्ञानेश्वर मोरे व सौ कमल हनुमंत मोरे यांनी मिळून आतापर्यंत अनेक गर्भवती महिलांचे गर्भाचे लिंग परीक्षण केले आहे तसेच  सध्या तपासणीसाठी आणलेल्या गर्भवती महिलेला त्याच डॉक्टरांनी पाठवलेले आहे
त्यामुळे वरील आरोपीविरुद्ध पीसीपीएनडीटी कायद्यानुसार कलम २३,२५ व २९ नुसार मा. प्रथम वर्गदंडाधिकारीसो इंदापूर यांच्या न्यायालयात डॉक्टर संतोष खामकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय इंदापूर यांनी कायदेशीर फिर्याद दिली
           सदरची कारवाई डॉक्टर माधव कणकवळे, जिल्हा शल्य चिकित्सक औंध पुणे यांचे मार्गदर्शनाखाली डॉक्टर संतोष खामकर सह  डॉक्टर एकनाथ  चंदनशिवे वैद्यकीय अधीक्षक बावडा ग्रामीण रुग्णालय, डॉक्टर श्रीकृष्ण खरमाटे सहा अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय इंदापूर, डॉक्टर अमोल खनावरे वैद्यकीय अधिकारी बावडा ग्रामीण रुग्णालय यांनी पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई केली. 
            सदरची कारवाई डॉक्टर अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधीक्षक बारामती,तसेच गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सपोनि नागनाथ पाटील,  सहाय्यक फौजदार केबी शिंदे, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक मोहिते, एएचटीयु पथकाचे पोलीस निरीक्षक चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी देशमुख यांनी मिळून कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा