लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर पोलीस ठाणे : नगरपरिषद, तुळजापूर चे पथक दि. 17 मे रोजी 11.30 वा. सु. तुळजापूर शहरात अतिक्रमन हटवण्याची मोहीम राबवताना अजय दत्तात्रय कोकाटे यांचे बाकडे जप्त करुन वाहनात ठेवले होते. यावर कोकाटे यांनी अतिक्रमण कारवाईस विरोध करुन व आरडा-ओरड करुन ते बाकडे वाहनातून बाहेर काढून घेतले. तसेच पथकातील प्र. स्वच्छता निरीक्षक- दत्तात्रय साळुंखे यांची गचांडी धरुन व बुक्क्यांनी मारहान करुन त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारे साळुंखे यांच्या शासकीय कर्तव्यात कोकाटे यांनी जाणीवपुर्वक अडथळा केला. यावरुन दत्तात्रय साळुंखे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा