पुसेसावळीत माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
पुसेसावळी ता. खटाव येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्यूनिअर कॉलेजच्या सन १९९१ इयत्ता १० वीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. माजी शिक्षक तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा स्नेहसंमेलन सोहळा पुसेसावळी कलाई गार्डनमध्ये संपन्न झाला. स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य मुबारक बागवान होते. तर स्नेहसंमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीदेवीच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी विजय संकपाळ, विठ्ठल पवार, विमल माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल श्रीफळ देऊन व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले, कार्यक्रमात दिवंगत विद्यार्थी व शिक्षक तसेच कोरोनाकाळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अनेकांच्या मनोगतातून शाळेतील शिक्षकांच्या संस्काराचा आपल्या आयुष्यात खुप उपयोग झाला असून अनेकांनी जून्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी स्नेहभोजन कार्यक्रम ही पार पडला.
यावेळी उपस्थित शिक्षक, विद्यार्थी, मान्यवर यांचे स्वागत सत्कार विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष विजय कदम यांनी केले. कार्यक्रमास वर्षा राऊत, विद्या फरांदे, वर्षाराणी शहा, योजना कदम, विनय शहा, किरण कदम, संतोष खटावकर, कृष्णत कर्पे, ज्ञानेश्वर पवार, शुभांगी सवानंद, संदीप कदम, जिवन बोकडे, नितीन कारंडे, विजय भाग्यवंत, ठकसेन कदम, सुभाष सवानंद, मधुकर इंगळे, हरिभाऊ कदम, जगभाय इंगळे आदिसह शिक्षक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिश रोकडे यांनी केले. तर आभार सौ. रोकडे मॅडम यांनी मानले.
फोटो
पुसेसावळी - माजी विद्यार्थी, विद्यार्थिनीसमवेत महात्मा गांधी विद्यालयाचे आजी माजी शिक्षक व शिक्षिका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा