सिना -माढा रस्त्यामुळे करमाळा आणि माढा तालुका आणखी जवळ आला - आमदार संजयमामा शिंदे .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सिना - माढा उपसा सिंचन योजना पंपहाऊस ते डिलिव्हरी चेंबर पर्यंतचा कन्हेरगांव ते फुटजवळगांव हा सहा किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण झाल्यामुळे , करमाळा तालुका आणि माढा तालुका पहिल्यापेक्षा जास्त दळणवळणासाठी सोपा झाल्याचे समाधान असून , या रस्त्यासाठी दोन कोटी 17 लाख मंजूर झाले असून , इथून पुढे भविष्यात करमाळा तालुक्या बरोबरच माढा तालुक्यातील छत्तीस गावातील सर्वच रस्त्यांची कामे प्राधान्याने करणार असल्याचे , प्रतिपादन करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी केले .
कन्हेरगांव तालुका माढा येथे रविवारी १ मे रोजी सकाळी
सिना माढा उपसा सिंचन योजना पंप हाऊस ते डिलिव्हरी चेंबर कन्हेरगांव ते फुटजवळगांव डांबरीकरण कामाचे उद्घघाटन आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी आमदार संजयमामा शिंदे बोलत होते . यावेळी माढा वेलफेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष धनराज शिंदे उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकात कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी गावातील विविध विकास कामांचा आढावा घेऊन राहीलेल्या रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली .
यावेळी दहिवलीचे सरपंच तय्यब जहागीरदार,डिपोटी इंजिनिअर सि.टी.राठोड,ज्युनिअर इंजिनिअर जी.ए.सावंत,अकोलेचे सरपंच कांतीलाल नवले,कन्हेरगावच्या सरपंच मनिषा चव्हाण,फुटजळगावच्या सरपंच शोभाताई पवार,अकोलेचे माजी सरपंच महादेव घाडगे,किसन घाडगे,भारत नवले,चेअरमन आबासाहेब नवले,उपसरपंच विठ्ठल हांडे,दहीवलीचे उपसरपंच अमोल पाटील,तात्यासाहेब जगताप,अनिल तोडकर,फुटजवळगांव चे माजी उपसरपंच काकासाहेब पाटील , बापु पवार , भारत पाटील,ह.भ.प.विष्णु डोके महाराज,सोसायटीचे माजी चेअरमन नागेश मोरे,देविदास मोरे , विकास माने,सरपंच प्रतिनिधी दशरथ चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ कदम,गणेश माने,प्रवीण खोचरे,संजय पाटील, मुख्याध्यापक मोतीराम शिंदे , मुख्याध्यापक किशोरकुमार बगाडे , धनंजय माने,आबासाहेब टेकडे,उत्तम पाटील,बाळासाहेब पाटील, संजय डोके पाटील , जालिंदर केदार,महेश डोके,वैभव डोके,राजेंद्र केदार,सुधीर मोरे,विलास डोके, भारत लोखंडे,शुभम डोके पाटील, नवनाथ डोके,विजय मोरे,धनंजय खोचरे,विशाल डोके,सुनील मोरे,सतीश खोचरे,विजय डोके,सुनील डोके,सुधाकर डोके , शिवाजी भरगंडे,जोतीराम भरगंडे, विजय भरगंडे,विजय डोके,गोविंद डोके,आण्णासाहेब मोरे , योगेश पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक धनंजय मोरे यांनी तर आभार राजेंद्र केदार यांनी केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा